Maharashtra Assembly मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांनी विधानसभा चर्चेत आक्रमक होऊन सत्ताधाऱ्यांना घेरलं. यावर फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत, त्यांना “विरोधकांच्या भूमिकेत जाण्याची आवश्यकता आहे. पक्ष अभिनिवेश विसरून त्यांना प्रशिक्षण देण्यास तयार आहे,” असे सांगितले. गरज पडल्यास छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांनाही मदतीला पाठवू, असे ते म्हणाले.
राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेवर विरोधकांनी जोरदार आरोप केले. विशेषत: राजकीय गुन्हेगारीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. याशिवाय, मंत्री जयकुमार रावल, जयकुमार गोरे, योगेश कदम आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील आरोप झाले, ज्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा लावण्याची मागणी केली.